वैभववाडी रोटरी क्लबचे पुरस्कार जाहीर | सात जणांची निवड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 05, 2024 18:19 PM
views 1482  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका रोटरी क्लबच्यावतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार आज तालुकाध्यक्ष संजय रावराणे यांनी जाहीर केलेत.तालुक्यातील विविध क्षेत्रातील सात जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब वैभववाडी यांच्यावतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात.यावर्षी सात जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यामध्ये वैभवशाली शिक्षक मधूकर ज्ञानदेव पाटील, संतोष विठोबा मोरे,ताई बाबुराव व्हनाले,वैभवशाली कार्यकर्ता मनोहर प्रभाकर नारकर,वैभवशाली शेतकरी गुलझार काझी, वैभवशाली उद्योजक अवधूत आत्माराम माईणकर , वैभव गृहलक्ष्मी गितांजली गिरिधर रावराणे यांची निवड झाली आहे.१३जानेवारी रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.ही माहिती श्री रावराणे यांनी दिली.यावेळी संतोष टक्के, डॉ प्रशांत गुळेकर आदी उपस्थित होते.