
वैभववाडी : वैभववाडी रोटरी क्लबच्या माध्यमातुन दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. रोटरीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी आज जाहीर केलेत. या पुरस्कारांचे वितरण २४ जानेवारीला रोटरी कल्ब वर्धापन दिनी करण्यात येणार आहे.
वैभववाडी तालुका रोटरी क्लबच्या माध्यमातुन दरवर्षी तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा श्री.गुळेकर यांनी आज (ता.२१) केली.यावेळी त्यांच्यासोबत सचिव सचिन रावराणे, संजय रावराणे, संतोष टक्के, मुकुंद रावराणे, विद्याधर सावंत आदी उपस्थित होते.
कृषीक्षेत्रात विविध प्रयोग करणाऱ्या लोरे नं.२ येथील विलास नावळे यांना यावर्षीचा वैभवशाली शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. वैभवशाली उद्योजक म्हणुन समीर रावराणे, (आर्चिणे) वैभवशाली सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अनंत फोंडके (हेत) वैभवशाली शिक्षक विजय केळकर (उंबर्डे), वैभवशाली केंद्रप्रमुख स्वप्निल पाटील माधवराव पवार विद्यालय (कोकिसरे) वैभव गृहलक्ष्मी कल्पना पाटील (करूळ)यांना जाहीर करण्यात आले.
या पुरस्कारांचे वितरण २४ जानेवारीला वृदांवन रिसॉर्ट येथे सायकांळी सात वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व रोटरीयन आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी केले आहे.