राष्ट्रीयस्तर परिषदेसाठी वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणेंची निवड

हरियाणात दोन दिवसीय होणार परिषद
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 02, 2025 18:01 PM
views 309  views

वैभववाडी : शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांची निवड झाली आहे. हरियाणा येथील गुरुग्राम येथे ३व ४जुलैला ही दोन दिवसीय परिषद होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य आणि संघराज्य प्रदेशामधील संस्थांसाठी ही परिषद असून सवैधानिक बळकटीकरणात शहरी संस्थांची भूमिका तसेच लोकशाही आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर ही परिषद होणार आहे. या परिषदेकरिता राज्यातील ४८सदस्य सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीच्या श्रद्धा रावराणे यांची निवड झाली आहे.