वैभववाडीत धुवाॅधार पाऊस ; बांधकाम सभापतींच्या प्रभागातील रस्त्या जलमय

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 05, 2023 13:35 PM
views 465  views

वैभववाडी : तालुक्यात सकाळ पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नदी , नाले ओसंडून वाहू लागले आहेत. शहरातही पावसाचा जोर कायम आहे.

शहरातील प्रभाग 12मधील वैभववाडी -सांगुळवाडी रस्ता जलमय झाला आहे. गटार ओव्हरफ्लो झाली असून संपूर्ण पाणी रस्त्यावर आले आहे. या भागातील काही घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी येथील गटार सफाई संदर्भात वेळोवेळी मागणी केली होती. मात्र त्याची पुर्तता झाली नसल्याने दरवर्षी मोठ्या पावसात या समस्येला सामोरे जावे लागत आहे.