
वैभववाडी : दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित वैभववाडी लोकोत्सव उद्या दि. ३० मार्चपासून सुरू होतोय. तीन दिवसीय चालणा-या लोकोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वा होणार आहे.
येथील दत्तकृपा प्रतिष्ठान गुढीपाडव्याचा मुहुर्तावर दरवर्षी वैभववाडी लोकोत्सवाचे आयोजन करते. यावर्षी ३० मार्च ते १ एप्रिल असा तीन दिवस हा लोकोत्सव दत्तमंदीर नजीकच्या पटांगणात रंगणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना केंद्रबिंदु मानुन या लोकोत्सवामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिलला गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी ४.३०वा हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या लोकोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांसाठी खेळ पैठणीतर्गंत विविध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये विजेत्या महिलांकरीता गृहपयोगी किंमती बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये पैठणीसह फ्रीज, कुलर, गॅस शेगडी, किचनसेट अशी अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या देखील विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले असुन विजेत्यास सोन्याचे नाणे मिळणार आहे. याशिवाय अन्य बक्षिसांची लयलुट करता येणार आहे. या लोकोत्सवात तालुकावासीयांनी सहभागी व्हावे. याशिवाय हिंदु नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन दत्तकृपा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी केले आहे.