
वैभववाडी : नगरपंचायत वाभवे-वैभववाडीची सर्वसाधारण सभा ११ वा. सुरु झाली .परंतु गणपूर्ती अभावी सभा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.तदनंतर ही सभा चालू केल्यानंतर सदस्य कमी होते, परंतु काही धोरणात्मक विषय सभेला असल्यामुळे सर्व सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असल्याने सभा तात्पुरती स्थगित करून नवीन सभेचा वेळ सांगण्यात येईल असे घोषित केले. सदर सभा सर्व सदस्यांना सूचना देऊन बहुसंख सदस्यांच्या उपस्थितीत दुपारी २:१५ वाजता सुरू करण्यात आली असा खुलासा नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी विरोधी नगरसेवकांनी केलेल्या आरोपांवर केला आहे.










