
वैभववाडी : ग्रामीण रुग्णालय वैभववाडी आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात २०जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे वैभववाडी तालुका अध्यक्ष राजेश पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वस्थ नारी सशक्त परिवार" अभियानांतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयात आज (ता.२९) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तालुक्यातील २०रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले. या रक्तदात्यांचे रुग्णालय प्रशासन व रक्तपेढीकडून आभार मानण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अर्जुन नरोटे , डॉ. हर्षद माकोडे. वैद्यकीय अधिकारी,मुख्य अधिपरिचारिका श्रुती राणे ,वर्षा खांडेकर, काजल पाटील, रविकुमार पाटील, प्रकाश तेली, निलेश झोरे, अमोल मते, रेखा पवार, राजेश पवार, रक्त संकलन विभाग सिंधुदुर्गनगरीचे डॉ. भारती ठोंबरे, धनपाल इंगोले, प्रांजली परब, भारती भोसले, ऋतुजा हरमळकर, मिलिंद कांबळे, असलम शेख,सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे प्रशांत लाड ,संजय गुरखे , रुपेश वारंग इत्यादी उपस्थित होते.










