
वैभववाडी : करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळित झाली होती. हा प्रकार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्यावतीने दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
तालुक्यात काल पासून पावसाची संततधार सुरू आहे.आज दुपारी घाट परिसरात मुसळधार सरी कोसळल्या.याचा फटका करुळ घाटाला बसला आहे. घाटात सायंकाळी दरड कोसळली.दरडीसोबत काही मोठे दगड रस्त्यावर आल्याने अवजड वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.राष्टीय महामार्ग प्राधिकरण विभागाने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.










