सडुरे - शिराळे ग्रामपंचायतीच्या पर्यटन वेबसाईटचं पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

२७ सप्टेंबरला कार्यक्रम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 26, 2025 14:13 PM
views 239  views

वैभववाडी :  सडुरे- शिराळे ग्रामपंचायतीच्या पर्यटन वेबसाईटचा पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्या ता.२७सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. श्री देव रवळनाथ मंदिर सभागृहात लोकार्पण सोहळा होणार आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला तहसीलदार सुर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, रानमाणुस प्रसाद गावडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, वेबसाईट निर्माणकर्ता गुलजार काझी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच दिपक चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.