
दोडामार्ग : पिकुळे देऊळवाडी परिसरात असलेल्या मोरीजवळ मुख्य रस्त्याला एक मोठे भगदाड पडले आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि कोणताही सूचना फलक नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिला आणि दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी संबंधित विभागाने हा खड्डा तातडीने बुजवावा अशी मागणी केली जात आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.










