
वैभववाडी : सावंतवाडी येथील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेचे मृत्यूप्रकरण राजकीय दबावामुळे दडपले जात आहे. राजकीय वरदहस्त असल्याने अटक पुर्व जामिनावर संशयित आरोपी मोकाट फिरत आहे. आता याप्रकरणी राज्य महीला आयोगाने लक्ष घालावे अशी मागणी माजी सभापती माई सरवणकर यांनी केली आहे.
चव्हाण यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्याबाबत संबंधितावर गुन्हे दाखल झाले. मात्र, राजकीय दबावामुळे पुढील कारवाई थांबली.संशयितांना अटक पुर्व जामीन देखील मिळाला आहे. आता साक्षीदार याच्यांवर साक्षी साठी पुढे येण्याचे मोठे दडपण येऊं शकते. जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे का? हा आता प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न आहे.
राज्य महिला आयोगाच्या कानावर तरी ही बातमी गेली आहे का?.. त्यांना सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रात येतो याबाबत माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत महीला आयोगाने याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी श्री सरवणकर यांनी केली आहे.बेटी बचावो , लाडकी बहीण ह्या पेक्षा "सुरक्षित महिला" ह्या वर सरकार विचार करणार का आहे की त्यांना वाऱ्यावर सोडणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे .