
वैभववाडी : येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांचे दहा दिवसांच एनसीसी विभागाचे शिबीर ओरोस येथे नुकतच संपन्न झाले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले.
एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांच ओरोस येथे दहा दिवसांच शिबीर आयोजित करण्यात आले होते.रावराणे विद्यालयातील एनसीसी विभागाचे शिक्षक संदेश तुळसणकर यांच्या नेतृत्वाखाली येथील पथक या शिबिरात सहभागी झाले होते.या शिबिरात विद्यार्थ्यांना 'समता , बंधुप्रेम व देशप्रेम दृढ करणारे शिक्षण देण्यात आले.त्याचबरोबर सैनिकी प्रशिक्षणाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यार्थीनींनी शिबीराच्या विविध उपक्रमात सहभाग घेतला होता.हे शिबीर यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस. नादकर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांच कौतुक केले.