
वैभववाडी : करुळ डोणावाडी येथील चिमाजी भागोजी गुरखे वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वैभववाडी बसस्थानक चे वाहतूक नियंत्रक भागोजी उर्फ बाबू गुरखे तसेच पोईप ता. मालवण मंडळ अधिकारी संतोष गुरखे यांचे ते वडील होत. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनानंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. डोणावाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.