
वैभववाडी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीची सन २०२४-२५ची नुतन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी डॉ प्रशांत गुळेकर यांची निवड केली आहे.सचिव सचिन रावराणे तर खजिनदार पदी श्रीया धावले यांची निवड केली.या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार (ता.१४) सायंकाळी ७वा येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे अशी माहिती मावळते अध्यक्ष संजय रावराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील वैभव हॉटेल येथे रोटरी क्लबची पत्रकार परिषद झाली.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ प्रशांत गुळेकर,माजी अध्यक्ष संतोष टक्के उपस्थित होते.यावेळी श्री रावराणे यांनी वर्षभरात रोटरी क्लबने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.रोटरीक्लबच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, महीलांसाठी पाककला स्पर्धा, वृक्षारोपण , रक्तदान शिबीर,उत्तम समाजकार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, फुगडी स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, निबंध, वक्तृत्व,, चित्रकला आदी स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच रोटरी महोत्सव, रानभाज्या महोत्सव,भरड धान्य प्रदर्शन आणि वाटप,महीलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण, महीलांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकिन वितरण, नवजात बालक व मातांना पोषक जीवनसत्त्वांच्या वस्तूंचे वाटप, बाजार पेठ स्वच्छता अभियान,करुळ घाट प्लॅस्टिक मुक्त मोहीम यासारखे अनेक उपक्रम रोटरी क्लबने राबविले.यामध्ये वैभववाडी बसस्थानक येथे शुद्ध व थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय व तालुक्यातील आठवीच्या विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षेला बसण्यासाठी प्रवृत्त करुन मोफत अभ्यास पुस्तकांचे वाटप केले.हे दोन उपक्रम सर्वात महत्त्वाचे ठरले असे श्री रावराणे यांनी सांगितले.
येणाऱ्या नवीन वर्षात गौरीशंकर धाकूजी यांच्या मार्फत वितरीत करण्यात आलेल्या २हजार वृक्षांचे वाटप करण्यात आले.तसेच महीलांचे आरोग्य, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व तपासणी शिबीर राबविली जाणार आहेत.तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.त्याचबरोबर प्लॅस्टिक मुक्त होण्यासाठी जनजागृती करून पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यावर भर दिला जाईल असं नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गुळेकर यांनी सांगितले.नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष -प्रशांत गुळेकर, उपाध्यक्ष मनोज सावंत, सचिव सचिन रावराणे, खजिनदार श्रिया धावले,सार्जंट ॲक्ट आर्म्स प्रशांत कुळये,क्लब एक्झुकिटिव्ह सेक्रेटरी विद्याधर सावंत,क्लब फाऊंडेशन डायरेक्ट स्नेहल खांबल,क्लब मेंबरशिप डायरेक्टर सलोनी टक्के,क्लब पब्लिक इमेज डायरेक्टर नामदेव गवळी,सर्वीस प्रोजेक्ट डायरेक्टर मुकुंद रावराणे,क्लब लर्निग फॅसिलिटी डायरेक्टर मिलिंद मेस्त्री,यंग लीडरशीप डायरेक्टर पुजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे.