वैभव नाईक यांनी घेतलं कुणकेश्वराचं दर्शन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 04, 2025 16:39 PM
views 65  views

देवगड : श्रावण मासानिमित्त कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कुणकेश्वर मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान मंडळाचे अध्यक्ष एकनाथ तेली, उपाध्यक्ष गणेश वाळके, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, मालवण युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, कणकवली युवासेना समन्वयक तेजस राणे, शिवसेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री, युवासेना मालवण शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संतोष लाड, संजय वाळके, शैलेश बोंडाळे, महेश जोईल, विलास वाळके, मंगेश पेडणेकर, अनिल धुरी, दीपक घाडी, प्रमोद साटम, श्रीकृष्ण बोंडाळे, विलास कुलकर्णी, महेश ताम्हणकर आदी उपस्थित होते.