
सिंधुदुर्ग : माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ओरोस वरची परबवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिरासाठी प्रशस्त असा सभामंडप बांधण्यात आला आहे. नुकतेच या सभामंडपाचे उदघाटन वैभव नाईक हस्ते करण्यात आले. ब्राह्मणदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यादृष्टीने याठिकाणी सभामंडप बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. ती मागणी पूर्णत्वास नेत वैभव नाईक यांनी सभामंडपासाठी ८ लाख रु. निधी दिला होता.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख सचिन कदम, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, रवी कदम,राजू घाडीगावकर,भगवान परब, माजी पं. स. सदस्या सुप्रिया वालावलकर, निलेश ओरोसकर, रवींद्र परब,प्रमोद परब,रमाकांत परब,महादेव परब,शशिकांत परब, देवरत वारंग, आशिष परब,भावेश परब,विक्रांत परब,स्वप्नील परब, रोशन परब,रोहन परब,सूर्यकांत परब,सिद्धेश पाडावे, दीपक परब, विकी परब आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.