वैभव नाईक यांनी फक्त राजकीय सेटलमेंटच करावी

अंकुश जाधव यांचा पलटवार
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 26, 2023 20:30 PM
views 132  views

सिंधुदुर्ग : होय राजकारण हे मन रमत असेल तरच करायला हवं अन्यथा ते करू नये त्यापेक्षा थांबलेल बर या विधानाच आम्ही जाहीर समर्थन करतो आणि माजी खासदार निलेशजी राणे साहेबांनी या केलेल्या वक्तव्याचा आम्हाला कार्यकर्ता म्हणून गर्व आणि अभिमानही.यांचा अर्थ आणि समज ज्यांनी नेहमीच राणे परिवाराचा द्वेष करत असलेल्या आमदार वैभव नाईक यांना कळणार नाही त्यांनी फक्त राजकीय सेटलमेंटच करावी अशी परखड टीका माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव केली.

        आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर टीका केली. त्याला प्रसिद्धीपत्रकातून माजी सभापती जाधव यांनी जोरदार उत्तर दिले. जाधव म्हणाले की,राजकारण असो  समाजकारण किंवा अन्य कुठंही क्षेत्र असो त्यात मन रमल किंवा समाधान वाटत असेल तरच काम करत असतात तरच त्यात सकारात्मक रिजल्ट मिळतात.मात्र एखाद्या क्षेत्रात मन रमत नसेल तर काम करण्यात काही अर्थ नसतो.मनाविरुद्ध केलेलं काम आनंद देत नाही आणि त्यात रिजल्ट ही मिळत नाही.माजी खासदार निलेश राणे यांनी जी राजकीय भूमिका जाहीर केली होती त्याचा अर्थ आमदार नाईक यांच्या समजण्यापलीकडे आहे.नाईक यांची राजकीय कारकीर्द च मुळी राणे परिवाराचा अपप्रचार करणे,द्वेष करणे अशीच आहे त्यातूनच ते मोठे झाले आहेत.अशी जिल्ह्यात काही मंडळी आहे हे जनतेला माहित आहे.जिल्ह्यातील राणे परिवाराला असलेला जनाधार यामुळे आतली आणि बाहेरची सुद्धा मंडळी यांना पोटदुखी चा आजार जडला आहे.जनतेला नेहमीच खोटं सांगून फसवू शकत नाही आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात निलेश राणे यांना जनतेतून वाढता पाठींबा मिळत आहे त्यामुळे आमदार नाईक बिथरले आहेत.त्यांना आपला पराभव दिसत आहे तयामुळेच ते बरळत आहेत.नाईक हे स्वतःची आमदारकी वाचविण्यासाठी नियोजनबद्ध सत्ताधारी मंडळीच्या संपर्कात तर दुसरीकडे मातोश्रीवर आपण कसे निष्ठावान गडी आहे भासवीत आहे, याचे विश्लेषण अनेक पत्रकार मंडळी त्यांच्या ब्लॉग वर केलेलं आहे. त्यामुळे नाईक यांनी उगाचच आमच्या नेत्यावर टीका करू नये.

आगामी काळात भाजप च्या वरिष्ठ नेत्यांच्या आशिर्वादामुळे आणि जिल्हातील पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचं बरोबर जनता यांच्या सहकार्याने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निवडून येणार आहे. आमदार नाईक नावात वैभव असून चालत नाही तर कामात आणि कर्तृत्वात ही असावे लागते ते तुमच्यात नाही. भाजप ते वैभव,विकासाचे सुगीचे दिव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आणले आहे आणि भविष्यात ही आणणार आहे असा विश्वास आणि खात्री जिल्यातील जनतेला आहे अशी स्पष्ट भूमिका माजी समाज कल्याण सभापती जाधव यांनी व्यक्त केली.