आवळेगावात वैभव नाईकांच्या माध्यमातून ५७ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 07, 2024 15:17 PM
views 182  views

कणकवली :  आवळेगाव या गावात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ५७ लाख रुपयाची विकासकामे मंजूर करण्यात आली असून या विकासकामांचे भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. 

           यामध्ये बजेट २०२२-२३ अंतर्गत आवळेगाव कुंभारवाडी ग्रा. मा. १३३ डांबरीकरण करणे निधी १९ लाख रु. आणि आवळेगाव टेंबवाडी, दाबटेवाडी ग्रा. मा. १३२ डांबरीकरण करणे निधी २८ लाख रु. आमदार फंडातून आवळेगाव मधलीवाडी जाणारा रस्ता डांबरीकरण करणे निधी ५ लाख आणि आवळेगाव भटवाडी जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख रु.  या कामांची भूमिपूजने करण्यात आली. 

           यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, उपतालुकाप्रमुख सचिन कदम,  विभाग प्रमुख नरेंद्र राणे,  विभाग संघटक संदीप सावंत, आवळेगाव उपसरपंच विवेक कुपेरकर, माजी सरपंच सुनील सावंत, शाखा प्रमुख नितीन सावंत, ग्रा. प सदस्य अमोल सावंत, राजाराम सावंत,निवृत्ती सावंत, दिनेश परब,पांडुरंग कासार, गुरू मुंज, विद्या मुंज, राजू मुंज,विष्णू तीळवे, सतीश तीळवे ,बंड्या सावंत,उदय सावंत, विजय पवार आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.