तेंडोलीत लोकसहभागातून उभारलेल्या सभामंडपाचं वैभव नाईकांच्या हस्ते उदघाटन

Edited by:
Published on: February 03, 2025 20:00 PM
views 31  views

कुडाळ : तेंडोली गवाळवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे ओम गणेश मित्रमंडळाने लोकसहभागातून सभामंडप उभारला असून आज या सभामंडपाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी मंदिरात दर्शन घेतले. देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, अरुण राऊळ, माड्याचीवाडी माजी सरपंच सचिन गावडे, एम. बी. गावडे, नर्सरी उद्योजक बाळा आमडोसकर, गणपत आमडोसकर,सुभाष आमडोसकर,झीला वालावलकर, बाळू परब, अशोक राऊळ, अनिल राऊळ, बाळा वालावलकर, आनंद राऊळ, संतोष आमडोसकर,स्वप्नील राऊळ, प्रताप आरोलकर, चिन्मय आमडोसकर, आप्पा परब, रुपेश आमडोसकर, दशरथ वालावलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.