गुंडगिरी, दडपशाही विरोधात वैभव एकटा लढला

शिवसेनेवर संकट येते तेव्हा कोकण धावून येते : उद्धव ठाकरे
Edited by:
Published on: November 13, 2024 19:37 PM
views 111  views

मालवण : मालवण : महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा // पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण // लोकसभेत आपण कमी पडलो // कोकणाचा पराभव हृदयाला धक्का लावून गेला // कोकण म्हणजे आमचं हृदय // यापुढे असे होऊ नये // शिवसेनेवर संकट येते तेव्हा कोकण धावून येते // कोकणावर संकट येते तेव्हा शिवसेना धावून येतो // मोदी, शहा, शिवसेना संपवायला निघाले आहेत // त्याचवेळी बाळासाहेबांनी युतीत भाजपा ठेवली नसती तर आज भाजपा औषधाला शिल्लक राहिली नसती // महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेची मशाल पेटली आहे // वैभव नाईक बद्दल अभिमान // मिंदेसारखे लाचार नाही झाले // जुनी शिवसेना पुन्हा उभी राहते // आमच्या आडवे आले तर आडवंच करू // ही ताकद तुमच्यात आहे // कोकणाचं वैभव जपा // गुंडा  पुंडाना राज्य देऊ नका // गुंडगिरी, दडपशाही विरोधात वैभव एकटा लढला // उपरकर निवडणुकीला उभे होते त्यावेळी दहा दिवस मी इथे ठाण मांडून होतो // नको तो धोंडा का मारून घेतलात?// मोदींनी यावे इकडे // घराणेशाही पहा // उद्धव ठाकरेंचे आव्हान // शिवसेना पक्ष माझ्या वडिलांनी स्थापन केला // तेव्हा तुम्ही कुठे होता?// मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबानी स्थापन केली // शिवसैनिकांनी माझ्याकडे जबाबदारी दिली तर तुमच्या पोटात का दुखतं?// आता इकडे घराणेशाही कशी चालते?// बाप खासदार आणि दोन्ही खांद्यावर दोन पोरं // मी हिंदुत्व सोडलं नाही आणि सोडणारही नाही // तुमची हुमूमशाही गाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो // सोलापूरला मोदी येणार होते // त्यांचं हेलिकॉप्टर लँड होतं नाही तोपर्यंत माझं हॅलीकॉप्टर उडवू दिलं नाही // पंतप्रधान पदाचा रुबाब असेल तर तस वागा // मला जो कायदा लागतो तो तुम्हालाही लागला पाहीजे // सोयाबीनला हमीभाव का नाही दिलं // आमचं सरकार येतंय सरकार // मिंदेच्या चिंद्या झाल्या // दरोडेखोरांना, इकडे घुसून मारिन तिकडे घुसून मारिन अशा धमक्या देणाऱ्यांना साथ देता?// सरकारी यंत्रनेचा दुरुपयोग करता // छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचा सुड उगवणार कि नाही?// शिवरायांचे मावळे असाल तर भाजपा, मिंदे गटाच्या उमेदवाराला एकही मत देऊ नका // मोदींची पण बॅग तपासली होती पण त्यानंतर त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं // म्हणे वाऱ्याने पुतळा पडला // मग मिंदेची दाढी नाही फडफडली वाऱ्याने?// सावंतवाडीत केसरकर पडतील तर आणि इकडची पिल्लं गेली कि कोकणाला चांगले दिवस येतील // कोरोना काळात आपण कुठेही कमी पडलो नाही // औषधे कुठे कमी पडू दिली नाही // टास्क फोर्स नेमली होती // सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राने वाचवला // महाराष्ट्रातून एकही उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही // सर्व उद्योग गुजरातला घेऊन गेलात // आणि रिफायनरी कोकणात आणता?// रिफायनरी गुजरातला घेऊन जा // मोदी आणि शाह आज आहेत उद्या नाहीत // दुर्दैवाने खासदार झालेले मला आव्हान देतायत // हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटारूना थांबवं // महाराष्ट्र लुटू देणार नाही हे एकच व्यक्ती उद्धव ठाकरे // जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार // मुलींप्रमाणे मुलांना शिक्षण मोफत देणार // करोडो रुपयांची मुंबई अदानीना देऊन टाकतायत // राम मंदिर बांधलं ते गळायला लागले // खोके घेऊन बसलेत बोके // आज महाराष्ट्र अडचणीत आहे म्हणून तुमची साथ हवी आहे // वैभव सोबत मी आहे // कोकणाचं वैभव कायम राहायचं असेल तर भगव्याशिवाय पर्याय नाही // उद्धव ठाकरे //