सिंधुदुर्ग मराठा समाज संघटनेच्यावतीने वधू - वर सूचक मेळावा !

Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 14:49 PM
views 472  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेच्यावतीने रविवार १७ डिसेंबर रोजी वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा कुडाळ शहरातील बॅ. नाथ पै विद्यालय येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेच्या जिल्हा महिलाध्यक्षा प्रा. नीलम धुरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन अॅड. नीता सावंत-कविटकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष तथा समाजसेवक सदासेन सावंत, तालुका महिला अध्यक्षा प्रा. पूनम सावंत, बांदा विभागीय अध्यक्षा प्रा. प्राजक्ता मोरजकर, सौ. दिप्ती कानडे, सोमेश्वर सावंत, राकेश सावंत, पुष्पराज सावंत, राजेंद्र तिरोडकर आदींच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. या वधूवर मेळाव्यास वधूवरांसह त्यांच्या पालकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

मेळाव्यास येताना वधूवर व पालकांनी आपले फोटो व बायोडेटासह अन्य वैयक्तिक माहिती सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदासेन सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रा. नीलम धुरी, मोबा. ९४०३५६२०३९, किंवा राजेंद्र तिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा. मेळाव्यात जिल्हयातील वधूवरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सदासेन सावंत यांनी केले आहे