महसुल विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरावी : बाळू निचम

Edited by: विनायाक गावस
Published on: June 28, 2023 11:27 AM
views 141  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुल विभागातील वर्ग १ वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ ची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात यावी अशी मागणी बाळू निचम यांनी महसूल विभागाच्या सचिवांकडे केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसुल विभागातील वर्ग १, वर्गर, वर्ग३, वर्ग ४ ची ७० टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त असून एकेकाकडे तीन तीन अतिरिक्त कार्यभार आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांची प्रशासकीय कामकाजात फार मोठी अडचण होत आहे. त्यात उपविभागीय अधिकारी, महसुल सावंतवाडी हे हितसंबंधातून सक्षम अधिका-याची परवानगी घेण्याअगोदर या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात परस्पर नेमणुका देवून त्यात भर टाकत आहेत. त्यामुळे आणखी प्रशासकीय कार्यभार कोलमडतो. तरी प्रस्तुत प्रकरणी गांभिर्यपूर्वक विचार करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुलची रिक्त पदे त्वरीत भरुन सहकार्य करावे अशी मागणी निचम यांनी केली आहे.