
वैभववाडी | प्रतिनिधी
माजी सभापती श्री. अरविंद भास्कर रावराणे यांची पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. श्री. रावराणे यांचे मोठे बंधू स्व. विलास भास्कर रावराणे यांचे रविवारी दुःखद निधन झाले होते.
या घटनेनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी सोनाळी येथील रावराणे कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. विलास रावराणे यांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांना धीर दिला.
पालकमंत्र्यांनी दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो तसेच रावराणे कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावना व्यक्त केली.
या सांत्वनपर भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










