
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना, वेंगुर्ला ची तातडीची बैठक आज दिनांक 12/08/2023 रोजी सायं. 4 ते 6 यावेळेत वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली आहे..
या सभेत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असून वीज ग्राहकांच्या विविध अडचणी, समस्या तसेच मागण्या याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे..
तरी या बैठकीस जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा सचिव निखिल नाईक, तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी केले आहे.