
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दिवसेंदिवस समस्या वाढली असून अनेक नागरिक त्यामध्ये बालकं, शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक यांना जीव मुठीत घेऊन आपल्या कामासाठी घराच्या बाहेर जावे लागते. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांची भूक अनावर होऊन चावा घेण्याचा प्रकार वाढल्यामुळे काही सुचना राजू मसुरकर यांनी शासनाला केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या या मागण्यांचा पंधरा दिवसात तातडीने पाठपुरावा करुन शासन निर्णय करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसे न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात नागरिकांच्या जनहिताच्या दृष्टीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने जनहित याचिका सादर करावी लागेल असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्यांमध्ये भटक्या मोकाट व पाळीव कुत्र्यांमुळे जीव मुठीत घेऊन घरातुन बाहेर पडताना बाजारात फिरते वेळी तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यामधील लहान बालके, शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिकांना रोज दैनंदिन घराच्या बाहेर पडते वेळी भटके कुत्रे अशा नागरिकांच्या अंगावर येऊन चावा घेतल्यामुळे रुग्ण गंभीर जखमी होऊन औषधोपचारासाठी रुग्णालयात येत असतात. अनेकदा रुग्ण त्यामध्ये गंभीर होऊन मृत्यूमुखी पडतात. कुठल्याही सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधीनां तसेच खासदार व आमदार यांचे यावरती भान नाही. अनेक नागरिकांना भटक्या व पाळीव कुत्र्यांच्या उपद्रवांमुळे रात्री बेरात्री ते कुत्रे भुंकत असतात. त्यामुळे मानसिक ताणतणावामुळे नागरिक आजारी पडतात. त्याचप्रमाणे ब्लडप्रेशर वाढत व झोप न लागल्यामुळे प्रेशर वाढत असतो. त्यामुळे अनेक नागरिकांना दवाखान्यात जाऊन उपचार करावे लागतात. मोकाट व भटके कुत्रे यांच्या दहशतीने व चावा घेण्याचा व अंगावरून येऊन भुंकण्याचा दिवसेंदिवस प्रकार वाढत चालल्याने अनेक नागरिक घरातुन बाहेर पडताना किंवा सकाळी व संध्याकाळी फिरताना आपल्या स्वसंरक्षणासाठी वृद्ध व महिला नागरिक हे घराबाहेर फेरफटका मारताना त्यांना हातामध्ये काठी घेऊन त्यांना चालावे लागते.
तसेच वाहनचालक (मोटारसायकल) आपल्या दैनंदिन कामासाठी जात असताना भटके व मोकाट कुत्रे वाहनाच्या मध्यभागी येऊन अनेकदा नागरिक गंभीर जखमी होऊन वेळप्रसंगी मृत्युमुखी पडतात अशी घटना महाराष्ट्रामध्ये चालु आहे. केंद्र सरकारने केंद्रीय तत्कालीन मंत्री मेनका गांधी यांनी संसदेत कायदा आणून भटक्या कुत्र्यांना ठार मारू नका! अशा प्रकारे संसदेमध्ये विधेयक संमत करून सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधींना या विधेयकाला मंजुरी दिली होती. खरं म्हणजे भटक्या कुत्र्याची समस्येबाबत उपाययोजना करायला पाहिजे होती. ती न केल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ते त्यामध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पण लोकप्रतिनिधींना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत नाही. लोकप्रतिनिधी जवळ सिक्युरिटी गार्ड असतो तसेच घराच्या बाहेर पडत असताना त्यांच्या कुटुंबीयांना आलिशान फोर व्हीलर गाडी असते त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा धोका त्यांना फारसा होत नाही. तसेच लोकप्रतिनिधी खासदार व आमदार भटक्या कुत्र्याने त्याच्या कुटुंबीयांवरती प्राणघात हल्ला करुन चावा घेण्याचा प्रकार झाला नाही. कुटुंबातील व्यक्ती मृत्युमुखी पडला नाही म्हणून अशा प्रकारचे उपायोजना भटक्या कुत्र्यांसाठी लोकसभा राज्यसभा व विधानसभेमध्ये विधेयक संमत करून असा गंभीर जीवघेणा प्रश्न लोकप्रतिनिधींकडून मार्गी लागला नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन मोकाट व भटक्या कुत्र्यांपासून धोका त्या नागरिकांना संभवतो.