जिल्हा न्यायालयात संविधान फलकाचे अनावरण

Edited by:
Published on: November 28, 2024 20:01 PM
views 152  views

सिंधुदुर्गनगरी :  संविधान दिनानिमित्त जिल्हा न्यायालयामध्ये संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी संविधान वाचन करण्यात आले त्याचबरोबर न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.बी.गायकवाड यांच्या हस्ते संविधान फलकाचे अनावरण करण्यात आले. 

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या संविधान कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.बी.गायकवाड, जिल्हा न्यायाधीश -१ व सत्र न्यायाधीश व्ही.एस.देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव एस.के.कारंडे,दिवानी न्यायाधीश व मुख्य न्यायदंडाधिकारी व्हि.आर.जांभुळे, सह दिवानी न्यायाधीश तथा मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी. तिडके, मुख्य लोक अभिरक्षक ऍड.आर.एच.वागज , उपमुख्य लोक अभिरक्षक ऍड.उल्का पावसकर,सहायक लोक अभिरक्षक ऍड.आर. एच.पवार, सहायक लोक अभिरक्षक ऍड.एस.एस खुणे,जिल्हा वकील संघटनेचे ऍड.अमोल सामंत,अन्य विधीतज्ञ ,जिल्हा सरकारी वकील ऍड,जी.एम.तोडकरी ,ऍड.एस.ए.राणे, ऍड.आर.व्ही.देसाई तसेच प्रबंधक,अधीक्षक व जिल्हा न्यायालय संकुलातील कर्मचारी उपस्थित होते.