
सावंतवाडी : मान्सुनपूर्व अवकाळी पावसानं सावंतवाडी शहरासह तालुक्याला झोडपून काढलं. गडगडाटासह मुसळधार पावसानं सकाळपासून हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
शहारत पावसानं हजेरी लावल्यान सर्वांची धांदल उडाली. गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत होता. मे संपायच्या आधीच पावासान हजेरी लावल्याने आंबा, काजू शेतकरी, व्यापारी यांना फटका बसला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. दरम्यान, बांदा व माजगाव येथे जोरदार पावसाने हजेरी लावली.