
वैभववाडी : नापणे धनगरवाडा येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर यांच्यावर घरासमोरील अंगणात अज्ञात चोरट्यांने हल्ला करून अंगावरील दागिने लंपास केले.हा प्रकार आज सकाळी ७.३०वा घडला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नापणे धनगरवाडा येथे श्री प्रभुलकर यांचं घर आहे. आज सकाळी ते अंगणात असताना एक अनोळखी इसम त्यांच्या प्रवेशद्वाराने आत आला. श्री.प्रभुलकर यांना काही कळण्याच्या आतच त्याने लाकडाने त्यांच्यावर हल्ला केला. मारहाणीनंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन घेऊन चोरटा दुचाकीवरुन पसार झाला आहे. या हल्ल्यात प्रभूलकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैभववाडी येथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधुरी अडुळकर, उद्भव साबळे, हरीश जायभाय, अभिजित तावडे घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसे तज्ञ पथक घटनास्थळी पोहोचले. भर दिवसा झालेल्या या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.