आरोग्य जपले तरच सार्वभौम विकास शक्य

लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयात एड्स जनजागृतीपर डॉ. रेडकर यांचं व्याख्यान
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 05, 2022 15:30 PM
views 208  views

दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये एड्स जनजागृती व्हावी म्हणून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ. रामदास रेडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.    


 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. यु. दरेकर होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप बर्वे व  डॉ. राजेंद्र इंगळे उपस्थित होते. प्रा. बर्वे यांनी प्रस्ताविकातून कार्यक्रमाचे हेतू, उद्देश सांगितला. डॉ. दरेकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या प्रबोदनात्मक व्याख्यानातून डॉ. रेडकर यांनी एड्स म्हणजे काय, एड्स बद्दलचे समाजात असलेले गैरसमज व त्यातून तो संसर्ग होण्याची असुरक्षित लैंगिक संबंध, बाधित रक्तपुरवठा, मातेकडून मुलाला होणारा संसर्ग, दूषित सिरीजचा वापर या चार कारणामुळे एड्सचा फैलाव होतो.  या  चार कारणापासून आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे व बाधितांवर  बहिष्कार न टाकता त्यांना प्रेमाने वागविले पाहिजे असे मार्गदर्शन केले. तसेच एड्स पासून स्वतःचा बचाव कसा करावा याबद्दल त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. दरेकर यांनीही एड्स  संदर्भातील काळजी आणि उपाय यावर विचार मांडले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल गवस हिने केलं. आभार डॉ. राजेंद्र इंगळे यांनी मानले.