
कणकवली : कणकवलीत संविधान जागर यात्रेचे आगमन होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानांचे विचार मांडणे हा योगायोग आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते , मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत, कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते.त्यामुळे संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही नक्की काढू . छत्रपतींना मानणारा प्रत्येक मावळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला बाप मानतो. संविधान बदलणार ही आवाज उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही चपराक आहे.भारतात फक्त बाबसाहेब आंबेडकर संविधान चालणार आहे .संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने राज्यातील आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्या, आणि देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्तीची एकजूट आवश्यक असल्याचे सांगा,असे प्रतिपादन आम.नितेश राणे यांनी केले.
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान जागर यात्रेत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष , ॲडव्होकेट वाल्मीक निकाळजे , कोकण समन्वयक नितीन मोरे , यात्रा सभा अध्यक्ष विकास गवाळे,योजनाताई ठोकळे,स्नेहाताई भालेराव,अशोक गायकवाड,अंकुश जाधव,आकाश आंबोरे,संदेश जाधव,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव,आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम,गुणाजी जाधव,सिद्धार्थ जाधव आदी सह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधानाचे रक्षण करू अशी शपथ घेऊ हेच या संविधान जागर यात्रेचे यश आहे. उद्या निवडणूक तोंडावर असताना कोणीतरी आपल्या गावात, वाडीत येऊन सभेत सांगेल की संविधान बदलणार आहेत, आणि तुमच्या मनात भीती घालेल.आजची संविधान जागर सभा या भुलथापेला चोख उत्तर आहे. बांगलादेश मध्ये बाबासाहेबांचे संविधान नाही म्हणून आज तिथे अराजकता मांजली आहे. आपल्या भारतात संविधान आहे. भारतात केवळ बाबसाहेब आंबेडकर यांचेच संविधान चालणार आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत का लटकले ? राहुल गांधीला स्वतःची जात माहिती नाही. या चांगल्या व्यासपीठावर राहुल गांधी चे नाव घेऊ नकात. राहुल गांधी यांना संविधानात किती पाने आहेत? याचे उत्तर लोकसभेत देता आले नाही. अशा राहुल गांधीच्या उमेदवारांना आपण मते देणार आहोत काय ? दुसरे उद्धव ठाकरे आणि त्याचे कुटुंब कधी ६ डिसेंबर रोजी च्या महानिर्वाण कार्यक्रमात मुख्यमंत्री व्हायच्या आधी कधी सामील झालेला एक फोटो दाखवा. मी मातोश्रीवर पाणी भरतो. दलित वस्तीत गेल्यानंतर गाडीत बसल्यावर हॅन्ड सॅनिटायजरने उद्धव ठाकरे हात धुवून घेतात. वक्फ बोर्ड विधेयकावेळी उबाठाचे ९ खासदार सभागृहाबाहेर का गेले? याचा जाब मुस्लिमांनी मातोश्री बाहेर एकवटून उद्धव ठाकरेंना केला असा टोला नितेश राणे यांनी लगावला. या यात्रेत अन्य आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी समाजाला संविधान प्रबोधनावर मार्गदर्शन केले.