माऊली मतिमंद निवासी विद्यालयात गणवेश वाटप

"सेलिब्रेटी एजचा राजा ग्रुप"चा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: November 10, 2025 21:44 PM
views 41  views

सावंतवाडी: आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित, माऊली मतिमंद निवासी विद्यालयात "सेलिब्रेटी एजचा राजा ग्रुप" च्या वतीने गणवेश वाटप करण्यात आले.

"सेलिब्रेटी एजचा राजा ग्रुप" या ग्रुप ने आपण कामावर असलेल्या शिप वर गणेश उत्सव साजरा करून त्या उत्सवात जमलेल्या देणगीतून दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात ३२ विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊचे वाटप केले.  या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चेतन कोचरेकर, रुची कोचरेकर, प्रतीक पाटील  उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राजू काळे यांनी केले व विद्यालयाची तसेच विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला माऊली मतिमंद व कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक पाटील यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले. माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सेलिब्रेटी एजचा राजा ग्रुप यांचे आभार मानले आणि अशीच ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून घडत राहो अशी प्रार्थना केली.