दुर्दैवी | मातीचा ढिगारा कोसळून कामगार महिलेचा मृत्यू

Edited by: विनायक गावस
Published on: February 14, 2024 12:36 PM
views 1023  views

सावंतवाडी : जिमखाना मैदान परिसरात बांधकामासाठी खोदाईचे काम सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे परप्रांतीय कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शारूबाई गोविंद राठोड ( ३०, सध्या रहाणार भटवाडी, मूळ रा. बिजापुर) असे या महिलेचे नाव आहे. तर या दुर्घटनेत अन्य एक महिला जखमी झाली असून तिचे नाव चांदीबाई निपाणा जाधव असे आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या महिलेला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.