दुर्दैवी | पिंगुळीत कारच्या धडकेत दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Edited by: भरत केसरकर
Published on: July 30, 2023 14:32 PM
views 1472  views

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे आज सकाळी ८ वाजता कारने सायकलस्वार मुलास ठोकरल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव विराज निलेश तेली (वय, १० वर्षे, मूळ बोर्डवे - कणकवली, सध्या राहणार : पिंगुळी - गुढीपूर) असे आहे. पोलीस तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. सदर गाडी चालक हा पोलीस कर्मचारी असल्याचे समोर येत आहे.