दुर्दैवी | विजेचा शॉक लागल्याने २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

खाकशी तिठा येथील घटना
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 07, 2023 19:13 PM
views 2979  views

देवगड : खाकशी येथे सर्विसिंगसेंटर च्या बाजूला मजुरीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने आसरोंडी पाटथर येथील अभिजीत अरविंद पांचाळ वय 22 याचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खाकशी तिठा येथील गोवेकर यांचेकडे आसरोंडी पाटथर येथील अभिजित अरविंद पांचाळ हे मजुरीचे काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेच्या थ्रीफेज लाईन तीव्र धक्का बसल्याने ते खाली कोसळले.

त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ देवगड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तेथील डॉक्टर आणि ते मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मयताचे वडील अरविंद पांचाळ यांनी देवगड पोलीस स्टेशनला दिली असून घटनास्थळी पोलीस दाखल होत रितसर पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे राजन जाधव करत आहेत.