महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली कारीवडेत फडकणार भाजपचा झेंडा

सरपंचपदाच्या उमेदवार आरती अशोक माळकर यांची प्रचारात मुसंडी
Edited by: विनायक गांवस
Published on: December 13, 2022 19:13 PM
views 293  views

सावंतवाडी : कारिवडे ग्रामपंचायतीत चौरंगी लढत होत असून भाजपच्या श्री देवी कालिका देवी ग्रामविकास पॅनलच्या थेट सरपंच पदाच्या  उमेदवार आरती अशोक माळकर यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटान या ठिकाणी आपलं सरपंच पदासह वेगळं पॅनल उभ केल आहे. या चौरंगी लढतीत सरपंच पदाच्या उमेदवार आरती माळकर यांच्या विजयासह भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली कारीवडेत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला‌.


वाडीवस्तीत जात श्री देवी कालिका देवी ग्रामविकास पॅनलच्या थेट सरपंच पदाच्या  उमेदवार आरती अशोक माळकर यांनी आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहचवला. सबका साथ, सबका विकासचा नारा भाजपने देशात दिला असून कारिवडेतील जनता मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास आरती अशोक माळकर यांनी व्यक्त केला. प्रचारासाठी फिरत असताना गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेचा कल हा आमच्या बाजूने आहे. ते नक्की आपला कौल आमच्या उमेदवारांना देतील. भाजप नेते,जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली कारीवडेत भाजपचा झेंडा निश्चित फडकेल असा विश्वास माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळूसकर यांनी व्यक्त केला. तर माजी सरपंच अपर्णा तळवणेकर म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत गावची केलेली सेवा व विकासाच्या मुद्यावर भाजपला पुन्हा एकदा कारिवडेवासीय संधी देतील. ११ सदस्यांसह सरपंचही भाजपचाच निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शक्तीकेंद्र प्रमुख आनंद तळवणेकर म्हणाले, पाच वर्षांत कोट्यवधीची काम गावात केली. लोकांचा विकास करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे नक्कीच भाजपच्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, माजी सरपंच अपर्णा तळवणेकर यांचा श्री देवी कालिका देवीच्या कुळ घरात मागील पाच वर्षांत केलेल्या कार्याबद्दल प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळूसकर, माजी सरपंच अपर्णा तळवणेकर, सरपंच पदाच्या उमेदवार आरती माळकर, अशोक माळकर, आनंद तळवणेकर, महेश गांवकर, मनाली लिंगवत, अन्वीता कारीवडेकर, प्रशांत राणे, उमेश गांवकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.