![](https://kokansadlive.com/uploads/article/17195_pic_20250211.2012.jpeg)
सिंधुदुर्गनगरी : काकास डाव्या डोळ्यावर व नाकावर हाताचे बुक्क्याने मारून गंभीर दुखापत करून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कसाल येथील पुतण्या सोनू कावले याला येथील अतिरिक्त न्याय दंडाधिकारी श्री तिडके यांनी एक वर्षाची कैद आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल खटल्यामधील फिर्यादी व आरोपी हे काका व पुतण्या असून आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असून तो दारू पिऊन फिर्यादी यांना शिव्या देत होता म्हणून फिर्यादी यांनी आरोपीला शिव्या का देतो असे विचारण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांचे डाव्या डोळ्यावर व नाकावर हाताच्या बुक्क्याने मारून गंभीर दुखापत करून शिवीगाळ व मारण्याची धमकी दीली म्हणून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास महिला पोलीस श्रीमती नागरगोजे यांनी केला होता. सदर खटल्यात सरकार तर्फे सहा.सरकारी अभियोक्ता शिल्पा गोबाडे यांनी 7 साक्षीदार तपासले तसेच विशेष सहा.सरकारी अभियोक्ता नितीन कुंटे यांनी युक्तिवाद केला होता.
मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.तिडके यांनी आरोपी सोनू गोविंद कावले ,रा. कसाल बालमवाडी, ता. कुडाळ,याला भारतीय दंड संहिता, कलम 325 या शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवत आरोपी सोनू कावळे याला १ वर्षाची कैद आणि 10,000,रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.