
मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव खांदवाडी, पेडवेवाडी, म्हाळूंगेवाडी येथे कर्ली खाडीत खाडीत होडीच्या सहाय्याने दिवस रात्र अनधिकृत वाळू उपसा आणि डंपर वाळू वाहतूक अनेक दिवस सुरु असल्याची तक्रार येथील अनिकेत दळवी यांनी संबधित विभागाकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी, रॅम्प जमीन मालकांना नोटीसा देण्यात आल्यात परंतु त्याच दिवशी संध्याकाळपासून पुन्हा वाळू उपसा तसेच वाळू वाहतूक सुरु करण्यात आल्याच त्यांनी या तक्रारीत म्हटले. तसेच वाळू उपशासाठी परप्रातींय कामगार असल्याच सांगत यामुळे गावात अनधिकृत प्रकारही होऊ शकतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय.
खांदवाडीला तिन्ही बाजूला कर्ली खाडीचा वेढा आहे. आणि वाळू उपशामुळे माडबागायती ०५ ते १० फुटू नदीत वाहून जात असल्याच त्यांनी या तक्रारीत म्हटलय. त्यामुळे उपजीविकेचं साधन गमावण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मी आणि शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून आपल्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. याबबात त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्राही करून म्हणावा मिळताना मात्र दिसत नसल्याच बोललं जाते. त्यामुळे संबधित यंत्रणा या विषयाकडे गांभिर्याने कधी पाहणार असा प्रश्न निर्माण होतोय.