कणकवलीत पोस्टरबाजीवर कारवाई !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 16, 2024 10:14 AM
views 888  views

कणकवली : कणकवली शहरतील कै. आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्सवर नगरपंचायत पथकाने कारवाई केली आहे. अनधिक उत्पन्न लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.ही कारवाई कणकवली पोलिस स्टेशनच्या सहकार्याने कणकवली नगरपंचायतीचे नोडल ऑफिसर  विनोद सावंत यांचे पथकाकडून  सदरची कारवाई मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .

कणकवली नगरपंचायतच्यावतीने उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील अनधिकृत फलक, होर्डिंग, पोस्टर्सवर जनहित याचिका उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार व महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय  नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकामध्ये नगरपंचायती कर्मचारी मनोज धुमाळे,  सतिश कांबळे, प्रशांत राणे, सचिन नेरकर, संदिप मुसळे, विश्वनाथ कदम यांचा सहभाग होता.