अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा !

संजू परब यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2024 10:42 AM
views 437  views

सावंतवाडी : शहरातील अनधिकृत परप्रांतिय फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच फेरीवाले यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची आग्रही मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. ही कारवाई करताना स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घ्या असेही यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सुचविले.

अनधिकृत फेरीवाल्यांची यापूर्वी यादी तयार करण्यात आली. या यादीप्रमाणे कारवाई करा अशी मागणी संजू परब यांनी केली. शहरात काढण्यात आलेला मोर्चा नगरपरिषदेकडून जात असताना शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेतली.