कणकवली वन क्षेत्रातील झाडांची अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत तोड ?

अनंत पिळणकर यांचा आरोप
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 04, 2024 12:08 PM
views 147  views

कणकवली : कणकवली फोंडा गंगोवाडी इथे सर्वे नंबर 456/5  इथे वनसंज्ञा क्षेत्र असताना कणकवली आरएफओ राजेंद्र घुणकीकर व लेखापाल जयमाला राठोड यांच्या परवानगीने झालेली झाडांची अनधिकृत तोड पाससहित कशी करण्यात आली असा सवाल कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला आहे.

कोल्हापूर येथून अधिकारी येऊन मालकाची जबाब घेऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. याच्यावर जिल्ह्याचे वनसंरक्षक लक्ष देणार आहेत की नाही कारवाई करणार आहेत की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. अनेक अनधिकृत प्रकरणांना वनसंरक्षक किती पाठीशी घालणार आहेत कणकवली येथील रेंज ऑफिसच्या गैरप्रकाराबाबत अनेक वेळा वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण केला आहे. परंतु सगळ्या अधिकाऱ्यांचे साटे लोटे असल्याचे निदर्शनास आलेला आहे. नाहीतर अशा गैर कृत्य कामांना पास सहित मंजुरी कशी दिली जाते आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्दैव असल्याचेही पिळणकर यांनी म्हटलंय.