कसाल गांगोचीराई गवळदेव मर्यादित जलतरण स्पर्धेत उमेश वनकर प्रथम

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 15, 2024 14:17 PM
views 383  views

सिंधुदुर्गनगरी :  कसाल गांगु ची राई येथे गांगोजीराई गवळदेव मर्यादित जलन करण स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेत उमेश बनकर हा विजय ठरला आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून कसाल गांगोचीराई येथील ग्रामस्थांच्या वतीने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 50 जणांनी सहभाग दर्शवला. यातप्रथम क्रमांक उमेश वनकर,द्वितीय क्रमांक प्रविण सावंत,तर तृतीय क्रमांक प्रथमेश बागवे.याने पटकावला यात उत्तेजनार्थ म्हणून प्रदिप सावंत,शुभम पोयेकर यांना घोषित करण्यात आले.या स्पर्धेत तरुणासोबतच उल्लेखनीय सहभाग-राणे गुरुजी,बाबा सावंत, मामा वारंग, सुरेश वनकर, सुरेश सावंत, श्री पाडावे ,सतिश बागवे,बापू सावंत,भाई बागवे,विजय बागवे,रवी सावंत यांनी आपला सहभाग दर्शवला.या स्पर्धेला महिला वर्गाची विशेष उपस्थिती लाभली. स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.