
वैभववाडी : तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या उंबर्डे गावच्या सरपंच व उपसरपंच पदाचा कार्यभार नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला. सरपंच पदी वैभवी दळवी तर उपसरपंच पदी अजीम बोबडे यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी सरपंच शेरपुद्दीन बोबडे व ग्रामस्थांनी स्वागत केले.
गावच्या ग्रामपंचायती निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या वैभवी दळवी या सरपंच पदासाठी निवडून आल्या. सोबत भाजपचे संपूर्ण पॅनल या निवडणुकीत विजयी झाले. या निवडीनंतर नूतन सरपंच व उपसरपंच यांनी आपला पदभार स्वीकारला. गावच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. अजीम बोबडे यांची उपसरपंच पदी निवड झाली. या निवडीनंतर दोन्ही नूतन पदाधिकारी यांनी आपल्या पदांचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माजी सरपंच शिरपूद्दीन बोबडे यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन उमर रमदुल,व्हाईस चेअरमन रमजान बोबडे, माजी सरपंच वैशाली दळवी, रत्नाकर बंदरकर, उमेश दळवी,सलीम पाटणकर आदी उपस्थित होते.यावेळी सरपंच दळवी म्हणाल्या, गावाला अभिप्रेत असलेला विकास ग्रामपंचायतच्या माध्यमातून केला जाईल.सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही सर्व काम करणार आहोत असे सांगीतले.उपसरपंच बोबडे म्हणाले,गावच्या जनतेने आम्हा सर्वांवर ठेवलेला विश्वास सार्थकी लावणार. वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली गावचा सर्वांगीण विकास केला जाईल, अस बोबडे यांनी सांगीतले.