उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं कुडाळमध्ये असं असणार नियोजन...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: February 02, 2024 08:15 AM
views 283  views

कुडाळ : उद्धव ठाकरे जन संवाद यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता कुडाळ आर एस एन चौक येथे त्यांचं भव्य स्वागत केलं जाणार असून ते जिजामाता चौक येथे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गट नेते अतुल बंगे, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, बंड्या कोरगावकर, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय पडते म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत ही प्रचाराची रणधुमाळी असून, सिंधुदुर्ग रत्नागिरी चे खासदार विनायक राऊत हे हॅट्रिक करतील असा दावा जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केला. 


उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर 4 फेब्रुवारी रोजी येत आहेत, यादरम्यान कुडाळ तालुक्याच्या वतीने आर एस एन चौकी येथे पक्षप्रमुखांचे जंगी स्वागत केले जाणार आहे, तर आरएसएन चौक ते जिजामाता चौक यादरम्यान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर याचवेळी आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून 15 दिव्यांग बांधवांना दिव्यांग मोटार सायकलचे वाटप केले जाणार आहे. व त्यानंतर जिजामाता चौक समोरील पटांगणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे नागरिकांशी संवाद साधतील असे यावेळी उपजिल्हाप्रमुख अमर सेन साबण यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेला प्रश्नावर बोलताना संजय पडते यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करत शिंदे गटाचे अस्तित्व कुठे आहे असा प्रश्न पत्रकारांना विचारला. तर यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री महोदयांनी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे उद्घाटन केले, चष्म्याच्या फॅक्टरीचे उद्घाटन केले हे प्रोजेक्ट कुठे गेले असा प्रश्न विचारत मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.

तर भाजपवर टीका करताना खासदारकीची निवडणूक तोंडावर आली असताना अद्याप भाजपचा उमेदवार ठरत नाही त्यामुळे खासदार विनायक राऊत हॅट्रिक करतील असा दावाही यावेळी बोलताना संजय पडते यांनी केला.