सत्ताधारी आमदारांनाच गृहमंत्री न्याय देवू शकत नाहीत ते आम जनतेला काय देणार

उद्धव ठाकरेंचा टोला
Edited by: भरत केसरकर
Published on: February 04, 2024 13:44 PM
views 177  views

कुडाळ : भाजपमध्ये सत्ताधाऱ्यांना सध्या सत्तेचा माज आला आहे. हा माज उतरवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेबरोबर कोकणवासीय म्हणून तुम्ही तयार आहात का? तुमच्या वैभवने असाच माज येथे 2014 मध्ये तेव्हा उतरवला होता.  तोच माज तुम्ही उतरण्यासाठी आता तयार आहात का? असे भावनिक आव्हान करत भाजपची सत्ता भविष्यात पलटून टाकण्यासाठी कोकणवासियांनी तयार राहण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कुडाळ येथील संवाद यात्रेचे केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले सत्ताधारी भाजपचे आमदार आपआपसात भांडत आहेत. कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. सत्ताधारी आमदारांनाच गृहमंत्री न्याय देवू शकत नाहीत. ते आम जनतेला हे सरकार काय न्याय देणार? त्यामुळे या सरकारला उलथून टाका. असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.