उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भगवा सप्ताह म्हणून करणार | शेतकऱ्यांना २ हजार किलो खत वाटप करणार

तालुकाप्रमुख संजय गवस यांनी दिली माहिती
Edited by: संदीप देसाई
Published on: July 26, 2023 19:19 PM
views 132  views

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भगवा सप्ताह म्हणून राबविण्यात येणार असून सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुमारे 2 हजार किलो खतांचे वाटप  करण्यात येणार आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख संजय गवस यांनी दिलीय. 

27 जुलै रोजी सकाळी.10.30 वा. कळणे महापुरुष मंदिर येथे या  खत वाटपाचे शुभारंभ होणार आहे. तर 28 जुलै रोजी साटेली येथे सायंकाळी 3 वाजता आणि 29 जुलै रोजी सायंकाळी 3 वा. माटणे विभागात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना खतांचे वाटप शैलेश परब यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यावेळी  युवा नेते गितेश राऊत, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वय बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, संपर्क प्रमुख केशव धाऊसकर, संदिप धरणे, राजन मौर्य तसेच तालुक्यातील बेसिक, युवासेना, महिला आघाडी तील प्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत अशी माहिती तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिली आहे.