
सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाविकास आघाडीचे नेते मा.उद्धवजी ठाकरे साहेब सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर ४ फेब्रुवारी रोजी येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे, माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रांतीक सदस्य व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली बांदा खामदेव नाका येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने स्वागतासाठी सहभागी होणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.