
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत होत आहे. मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले आहेत. याप्रसंगी खासदार विनायक राऊत म्हणाले, गद्दारी केली, बेइमानी केली त्यांना गाडायला उद्धव ठाकरे सावंतवाडीत आले आहेत. मंत्री होऊन काहीही उबवू न शकणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं जिल्हातील शासकीय मेडीकल कॉलेज हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात केली. आज त्याचा अभिमान आम्हाला वाटतो. कुटुंब प्रमुख म्हणून आपण कोकणवर प्रेम करत आहात. या परिवारातील लोकांना भेटायला आलात हे आमचं भाग्य आहे. बाळासाहेबांनंतरही ठाकरे कुटुंबाशी मातोश्रीशी इमान राखणार ही कोकणी जनता आहे अस ते म्हणाले .
यावेळी खासदार विनायक राऊत,आ. भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आ. रमेश कोरगांवकर, दत्ता दळवी, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, वरूण सरदेसाई, मिलींद नार्वेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, सतिश सावंत, संजय पडते, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, बाळा गावडे, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.