
कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्या 4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास कुडाळ येथे दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर आज शनिवारी आमदार वैभव नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिजामाता चौक येथे होणाऱ्या कॉर्नर सभे संदर्भात व वाहतूक व्यवस्थेत संदर्भात पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन बोभाटे, बाळा कोरगावकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रुती वर्दम, श्रेया गावंडे, ज्योती जळवी, सई काळप आदी उपस्थित होते.
4 फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यात दाखल होत आहेत यावेळी आरएसएन हॉटेल ते जिजामाता चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. तर जिजामाता चौक येथील मोकळ्या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कॉर्नर सभा होणार आहे. आज पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व आमदार वैभव नाईक यांनी उद्या होणाऱ्या जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाहणी करत आढावा घेतला.