मोदींचे आम्ही शत्रू नाही : उद्धव ठाकरे

Edited by: विनायक गांवस
Published on: February 04, 2024 08:32 AM
views 385  views

सावंतवाडी : मोदींचे आम्ही शत्रू नाही. आम्ही तुमच्या सोबत होतो. नंतर तुम्ही आम्हाला दुर टाकलं. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही. तुमच्या पिलावळीनं देशाचं काम केलं असतं तर पक्ष फोडायची गरज तुम्हाला पडली नसती‌. खासगी मेडिकल कॉलेजला पण मी परवानगी दिली होती मुख्यमंत्री असताना‌. चांगल्या गोष्टींच्या आड मी कधीही येणार नाही. पण, शासकीय मेडीकल कॉलेजच्या आड कुणी येत होत त्याची नाव घेऊ इच्छित नाही. बोलणाऱ्यांना बोलत राहूदेत लक्ष देऊ नका. निवडणूकीचा नारळ फुटूदेत मी परत येणार आहे. विजयाच्या सभेला ही येईन. गद्दारांची घराणेशाही आजही चालू राहिली असती जर तुम्ही ती चिरडली नसती. पानबुडीला मंत्री असताना गो अहेडच दिलं होत. नौदल दिन प्रथमच कोकणात साजरा झाला‌. पंतप्रधान यावेळी कोकणाला काहीतरी देतील अशी आशा होती. संकटात एकही पैसा यांनी महाराष्ट्राला दिला नाही. निदान आतातरी काहीतरी देतील. दिलं तर काही नाही पण पाणबुडी गुजरातला घेऊन गेले. जिथं येतात ते गुजरातला घेऊन जात आहेत. असे पंतप्रधान तुम्हाला पुन्हा हवेत का ? मोदी रथ फिरत आहे. त्याला गावकरी अडवत आहेत याचा अभिमान वाटत आहे. भारत सरकार असताना मोदी सरकार हे काय ? असा सवाल त्यांनी केला. 


हल्ली तर फोन सुरु केलेत. पुन्हा भाजपला मतदान करणार का विचारत आहेत. आम्हाला दहा वर्षांत काय मिळालं हा विचार सामान लोक करत आहेत. पुन्हा भाजपला मत देणार नाही असं सांगतोय. २०१४ ला 'चाय पे चर्चा' सारखं आपण 'होऊ दे' कार्यक्रम करू, गेल्या दहा वर्षांत काय मिळालं हे सरकारला विचारु  असं विधान त्यांनी केल. शेतकऱ्यांनी बोलावं यासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. नुसत्या घोषणा व  अंमलबजावणींचा दुष्काळ असेल तर दुष्काळात तेरावा महिना असणार 'मोदी सरकार' नको, त्यापेक्षा मिलीजुली असलेलं 'इंडिया आघाडी'च सरकार आम्हाला चालेल असं मत व्यक्त केल. तर मोदी सरकारच्या योजना त्यांनी वाचून दाखवल्या. सगळा फायदा गुजरातला, आम्ही करायचं काय ? किती स्मार्ट सिटी यांनी उभारल्या. मी विरोधक हा हुकुमशाहाचा व खोटारड्यांचा आहे. आताच्या सरकारमध्ये गॅंगवॉर आहे. तिसरी गँग ७० कोटींच्या घोटाळ्यात बुडलेली आहे. इथला गद्दार तुम्ही घेतला. भेकडांची फौज घेऊन आमच्यावर चालून येतायत ? भाजप संपवायच काम महाराष्ट्र केलं आहे. आमचा पक्ष हा शिवसैनिक आहे. आमची संघटना आणखीन फोफावत आहे. हिंदू तर आहेच पण मुस्लिम सुध्दा सोबत आहे. आमचं हिंदुत्व घर पेटवणार नाही. घरातील चुल पेटवणार आहे. तुमच्या ताकदीवर मी लढत आहे. उद्धव ठाकरेची ताकद हे वडिलोपार्जित आहे. ते कवच शिवसैनिकांच आहे. गद्दारांना गाडायच काम माझे शिवसैनिकच करती‌ल असा विश्वास माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.