ठाकरेंनी खुल्या मैदानात सभा घेऊन दाखवावी

निलेश राणेंची बोचरी टीका
Edited by: भरत केसरकर
Published on: February 03, 2024 15:28 PM
views 164  views

कुडाळ : उद्धव ठाकरे यांनी  कुडाळच्या भर बाजारपेठेत सभा घेऊ नये आणि लोकांना त्रास होईल असे काही करू नये. आम्हाला माहिती आहे की खुल्या मैदानात सभा घेऊन किंवा हॉलमध्ये सभा घेऊन त्यांना माणस जमवता येत नाही ते. आणि अशावेळी जर का गरज असेल तर आम्ही पण दोनशे पाचशेची मदत करू. उगाचच लोक ज्या ठिकाणी जमत आहे त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करू नये. खुल्या मैदानात सभा घेऊन दाखवावी अशी बोचरी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.